१० लाखांहून अधिक नागरिकांना वंदेभारत अभियानाचा लाभ
August 6, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वंदेभारत अभियानाचा लाभ  आतापर्यंत १० लाख ५९ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला असल्याचं विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पूरी यांनी दिली. आपल्या ट्विट संदेशात त्यांनी म्हटलं आहे की, ९ लाख ३९ हजार भारतीयांना विदेशातून परत मायदेशी आले तर १ लाख २० हजार नागरिक भारतातून परदेशात गेले.

६ मे पासून वंदेभारत अभियान सुरू करण्यात आलं आहे. काल या अभियानाअंतर्गत तीन हजार ८४१ भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत.