२६ जुलै रोजी मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री देशवासीयांशी साधणार संवाद
July 24, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ जुलै रोजी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या या मासिक कार्यक्रमाचा हा ६७ वा भाग आहे.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून
, तसंच दूरदर्शनवरूनही प्रसारित होणार आहे. या बरोबरचं न्युज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावर, तसंच मोबाईल अॅप, यू टयूबवरही ऐकता येईल.

हिंदितून प्रसारित झालेल्या या कार्यक्रमानंतर सर्व प्रादेशिक वाहिन्या आपापल्या प्रादेशिक भाषेत याचा अनुवादही प्रसारित करतील. त्याचं पुनर्प्रसारण रात्री आठ वाजता ऐकता येईल.