७४ व्या स्वातंत्रदिना निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर होईल ध्वजारोहण
August 14, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७४ व्या स्वातंत्रदिना निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल, त्यानंतर ते देशाला संबोधीत करतील. त्यानिमित्त दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे.

काल या संपूर्ण कार्यक्रमाची  रंगीत तालीम केली गेली. राष्ट्रीय सुरक्षा दल आणि अन्य सुरक्षा दालांचं बहूस्तरीय सुरक्षा कवच तैनात करण्यात आलं आहे.

पॅरा ग्लायडींगला उद्या मनाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलीसांनी वाहतुकी संबंधी नव्या सुचना जारी केल्या आहेत.