ADB च्या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री यांची उपस्थिती
July 29, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या गव्हर्नर्सच्या पाचव्या वार्षिक बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीत पुढील दशकात आशियायी विकासामध्ये बँकेची भूमिका या विषयावर विस्तृत चर्चा झाली.

सार्क सदस्य देशांदरम्यान कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनासाठी आपत्कालीन निधी उभारण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावाबाबत सीतारामन यांनी बैठकीत माहिती दिली.